जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल 10 हजार रोहिंग्ये राहत असून त्यातील 6 हजार जम्मू जिल्ह्यात आहेत. त्यांना अवैध पद्धतीने हिंदुस्थानात वसवण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली 6 बिगर सरकारी स्वयंसेवी संघटना चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहेत.
क्रिप्टो मार्केट घसरले; बिटकॉईन 96 हजार डॉलर
क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये सोमवारी जवळपास एक टक्क्याची घसरण झाली. इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज बायनान्सवर याचा परिणाम होत जवळपास एक टक्क्याची घसरण होत 96,100 डॉलरवर ट्रेड करत आहे.
दिल्ली ते केरळ विमान भाडे 22 हजारांवर
दिल्लीहून कन्नूर (केरळ) ला जाण्यासाठी 21 ते 22 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. देशातून दुबईला जाणे स्वस्त आहे, परंतु देशांतर्गत प्रवास करणे महाग झाले आहे, असे एका युजरने फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
नागा साधूंची महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये पेशवाई!
प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत आहे. रविवारी पंचदशनाम आवाहन आखाडय़ाने महाकुंभासाठी पेशवाई काढली. यावेळी कपाळावर भभूत, गळ्यात रुद्राक्ष, उंट, थार आणि बग्गीतून प्रवास करणारे साधू पाहायला मिळाले.