दहा हजार हिंदुस्थानी विदेशातील जेलमध्ये बंद

विदेशातील कारागृहात दहा हजारांहून अधिक हिंदुस्थानी नागरिक बंद आहेत. यातील 49 कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा मिळाली आहे. सौदी अरबमध्ये सर्वाधिक कैदी बंद आहेत, असे संसद सभागृहातील एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे. विदेशातील कारागृहामध्ये बंद असलेल्यांपैकी सर्वात जास्त सौदी अरबमध्ये 2 हजार 633 संयुक्त अरब अमिरातमध्ये 2 हजार 518, नेपाळमध्ये 1 हजार 317 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय, चीन, अजरबैजान, इटली, कुवेत, मलेशिया, ओमान, पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत.