मणिपूरमध्ये दोन प्रतिबंधित संघटनांच्या दहा सदस्यांना बेड्या

मणिपूरमध्ये दोन प्रतिबंधित संघटनांच्या दहा सदस्यांना विविध तीन जिह्यांतून अटक करण्यात आली. इम्फाळ पश्चिममधून कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या सात सदस्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल, दारूगोळा आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. इतर दोघांना इम्फाळ पूर्व जिह्यातून ताब्यात घेण्यात आले. प्रीपॅकच्या (प्रो) एका सदस्याला बिष्णुपूर जिह्यातून अटक करण्यात आली. ककचिंग आणि बिष्णुपूर जिह्यातील लोकांकडून खंडणी उकळण्यात यांचा समावेश होता.