महागाईचा मारा सुरूच फोन रिचार्ज पुन्हा महागणार

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या या वर्षाच्या अखेरीस त्यांचे दर आणखी वाढवणार असल्याचे वृत्त आहे. केवळ प्रीपेड मोबाईल रिचार्जच नाही तर पोस्टपेड मोबाईल रिचार्जदेखील महाग होऊ शकतात. अर्थात मोबाईल नंबर सक्रिय ठेवण्यासाठीही पैसे मोजावे लागतील. आताच्या घडीला 28 दिवसांसाठी सर्वात स्वस्त रिचार्जवर सरासरी 200 रुपये खर्च करावे लागतात. 2027 च्या आर्थिक वर्षापर्यंत टॅरिफमध्ये वाढ सुरू राहू शकते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाग होणारे रिचार्ज थेट मोबाइल कंपन्यांना फायदा करतील.