
बोगद्याचा काही भाग कोसळल्याने अडकलेल्या आठ कामगारांचा अद्याप शोध लागलेला नाही. तेलंगणातील नागरकुरनूल जिह्यातील एका बांधकामाधीन बोगद्याचा छत कोसळून 30 तासांहून अधिक काळ लोटला आहे. लष्कर, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी अथक प्रयत्न करूनही अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आले नाही. बेपत्ता कामगारांची जगण्याची शक्यता फार कमी असल्याचे तेलंगणाचे मंत्री जे. कृष्णा राव यांनी सांगितले. बोगद्याच्या आत चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. सरकारने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये चिखल, लोखंडी सळय़ा आणि सिमेंट ब्लॉकमधून बचावकर्ते मार्गक्रमण करत असल्याचे दिसते. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली तेव्हा सुमारे 70 लोक काम करत होते.