तेलंगणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाल्याच्या चर्चा असून पक्षाच्या 10 आमदारांनी बंद खोलीत बैठक घेतली. त्यामुळे पक्षनेतृत्वावर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, पक्षातील आमदारांमध्ये वाढत असलेल्या असंतोष शमवण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. पक्षातील काही आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहाण्यासाठी दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पक्षातील असंतोष गंभीर पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे.