मटण करी बनवायला नकार दिल्याने पतीने पत्नीने बेदम चोपले, मारहाणीत महिलेचा मृत्यू

मटण करी बनवायला नकार दिल्याने पतीने पत्नीची बेदम मारहाण हत्या केल्याची घटना बुधवारी तेलंगणामध्ये घडली. मलोथ कलावती असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

तेलंगणातील महबूबाबाद येथील रहिवासी असलेल्या कलावतीला तिच्या पतीने मटण करी करण्यास सांगितले. मात्र कलावतीने यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने कलावतीला बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याचे कलावतीच्या आईने पोलिसांना सांगितले.