बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे उद्या 5 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाहीत. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेजस्वी यादव यांना समन्स बजावले असून उद्या 5 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु तेजस्वी यादव सध्या कामात व्यस्त असल्यामुळे ते चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात अनुपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
22 डिसेंबरला तेजस्वी यादव यांना तर 27 डिसेंबरला लालू प्रसाद यादव यांना पीएमएलए अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु या चौकशीला तेजस्वी आणि लालू प्रसाद यादव हे दोघेही उपस्थित राहिले नाहीत.