… म्हणून तेजस, जनशताब्दी दादरपर्यंतच

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात येणाऱया तेजस व जनशताब्दी एक्स्प्रेस 15 एप्रिलपर्यंत दादरपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आणखी 13 दिवस गैरसोयीला तोंड द्यावे लागणार आहे.

सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईत येणाऱया काही एक्स्प्रेसचा प्रवास 15 एप्रिलपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकात समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.