ना विमा, ना पीयुसी…. विना हेलमेट चालवली दुचाकी, तेजप्रताप यादव यांच्यावर कारवाई

 

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी होळीच्या कार्यक्रमात एका पोलीस कर्मचाऱ्याला नाचायला भाग पाडल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. यानंतर तेजप्रताप यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होळीच्याच दिवशी ते बिना हेलमेट दुचाकी चालवताना दिसले.त्यामुळे या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे.

तेजप्रताप यादव यांनी होळीच्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर हेलमेटशिवाय दुचाकी चालवली.एवढेच नाही तर ते ज्या दुचाकीवर फिरत होते तिचा विमा आणि पीयुसी देखील संपले होते,अशी माहिती आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई करत 4 हजार रुपयांचे चलन कापले आहे. दरम्यान तेज प्रताप यांचे होळीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तेजप्रताप यांच्यावर टीका केली.

ठेका धर नाही तर निलंबित करेन, तेजप्रताप यादव यांनी पोलिसाला नाचवले