तेजप्रताप आणि हेमा यादव यांना 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

‘जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा’प्रकरणी आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सर्व आरोपींना 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सुनावणीवेळी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आणि मुलगी हेमा यादव उपस्थित होत्या. याआधी 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या अंतिम आरोपपत्राची दखल घेत सर्व आरोपींना समन्स बजावले होते. या प्रकरणात सीबीआयने लालू यादव यांच्यासह इतर 78 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात 30 सरकारी कर्मचाऱ्यांवर आरोप आहेत.