![jalna-sand](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/jalna-sand-696x447.jpg)
अवैध वाळू वाहतुकीला पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारीच नुसते खतपाणी घालत नसून तर त्यांच्या स्वतःच्या वाळू वाहतुकीच्या गाड्या सुरू असल्याचा आरोप महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
एवढेच नव्हे तर काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे सुद्धा अशा गाड्यांची नोंद असल्याचेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यामुळे पोलीस व महसूल यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत महसूल कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी महसूल संघटनेने आंदोलन केले होते. कारवाई करताना पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्याने त्यांचा निषेध सुद्धा महसूल कर्मचारी संघटनेने केला होता. या माइ समीवरचे फेब्रुवारी रोजी महसूल तहसीलदार विजय चव्हाण हे जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
पोलीस प्रशासनातील काही अधिकारी अवैध वाळू चोरीला खतपाणी घालत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध वाळू वाहतुकीचे वाहने चालतात, असे ते म्हणाले. यात काही कार्यरत पोलीस त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर अवैध वाळू वाहतुकीचे वाहने चालवतात, असा खळबळजनक आरोप तहसीलदार चव्हाण यांनी केला आहे. महसूल पथकावर कितीही हल्ले झाले तरी आम्ही वाळूमाफियांवर 4 पट कारवाई करून त्यांच्या नांग्या ठेचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.