बऱ्याचदा महत्त्वाचे डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी आपल्याला मोबाईल मध्ये स्कॅनर ॲप चा आधार घ्यावा लागतो. मात्र आता स्कॅनर ॲपही त्याचे पैसे चार्ज करायला लागले आहेत. तसेच बऱ्याचदा अशा ॲपमध्ये चित्रविचित्र जाहिराती झळकत असतात ज्यामुळे डॉक्युमेंट स्कॅन करण्यात अडथळा येतो. पण तुमच्या मोबाइलमध्येच लपलेला एक पर्याय आम्ही सांगणार आहोत, ज्यामुळे अगदी फ्री आणि जाहिरातीशिवाय डॉक्युमेंट तुम्हाला करता येईल. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा आणि लाइक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका.
1. तुमच्या मोबाईल मध्ये गुगल Drive असे App असेल. त्यावर क्लिक करा.
2. आता मोबाइलच्या खालील बाजूस ‘+’ चे चिन्ह असलेले व New असे लिहिलेले आढळेल. त्यावर क्लिक करा.
3. त्यानंतर तुम्हाला स्कॅनर चा पोर्शन दिसेल ज्यामध्ये तुम्ही थेट डॉक्युमेंट चा फोटो काढू शकतात किंवा मोबाइल मध्ये आधीच असलेले डॉक्युमेंट देखील स्कॅन करू शकता.
4. यानंतर डन म्हणून तुम्ही स्कॅन केलेले डॉक्युमेंट जेपीजी किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता ते डॉक्युमेंट तुमच्या मोबाईल मध्ये किंवा ड्राइव्ह मध्ये सेव होऊन जाते.
5. या पर्यायामुळे तुम्हाला एक पैशाचाही खर्च न करता आणि जाहिरातींचे अडथळे न येता सहज डॉक्युमेंट स्कॅन करता येते.