![team india open top bus](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/team-india-open-top-bus-696x447.jpg)
टीम इंडियाच्या विजय परेडसाठी वापरण्यात येणारा विजय रथ (Open-Top-Bus) मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. त्यामुळे परेड सुरू होण्यास उशीर होणार आहे.
View this post on Instagram
T20 वर्ल्डकप घेऊन टीम इंडिया गुरूवारी सकाळी हिंदुस्थानात परतली. खेळाडूंच्या स्वागताकरीता दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. यानंतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेळाडू मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नरीमन पाँईट ते वानखेडे स्टेडियम येथे खुल्या बसमधून विजययात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर टीम इंडियाचा बीसीसीआयच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.