जेतेपदाच्या प्रबळ दावेदारीचे प्रचंड ओझे घेऊन टीम इंडिया टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या आपल्या अभियानास प्रारंभ करणार आहे. हिंदुस्थानला सलामीलाच डार्क हॉर्स समजल्या जाणाऱया आयर्लंडशी भिडायचे आहे. टी-20 चा पहिला वर्ल्ड कप (2007) जिंकणाऱया हिंदुस्थानी संघाला नंतर 17 वर्षांत एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकाविता आलेले नाही. त्यामुळे रथी-महारथी खेळाडूंनी सजलेली टीम इंडिया यावेळी जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाचे सदस्य राहिलेले आहेत, मात्र जसप्रीत बुमराह व रवींद्र जाडेजा या स्टार खेळाडूंनी अद्यापि जगज्जेतेपदाचा करंडक उंचावलेला नाहीये. या खेळाडूंसह नव्या दमाचे खेळाडूही जगज्जेतेदाला गवसणी घालण्यासाठी आतूर झालेले आहेत. गतवर्षी हिंदुस्थानात झालेल्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त केले होते. 37 वर्षीय रोहित शर्माचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल. कारण 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱया वन डे वर्ल्ड कपपर्यंत तो खेळू शकणार नाहीये.
आयर्लंडकडे पॉल स्टार्ंलग, जोश लिटिल, हॅरी टेक्टर, अॅण्डी बालबर्नी असे टी-20 क्रिकेटचे प्रतिभावान शिलेदार आहेत. डावखुरा फिरकीपटू जॉर्ज डॉकरेल याच्यापासून हिंदुस्थानी फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे, मात्र टीम इंडियाकडे आयर्लंडपेक्षाही चांगल्या दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. रोहित आणि विराटमुळे यशस्वी जैस्वालला आयर्लंडविरुद्ध बाकावर बसावे लागेल. सराव सामन्यात ऋषभ पंतने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे या दोघांनाही संघात घ्यावे लागेल. इतर वेगवान गोलंदाजांना जसप्रीत बुमराहला चांगली साथ द्यावी लागणार आहे. शिवम दुबेला जाडेजाच्या साथीला दुसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी मिळू शकते. या घडीला हिंदुस्थानी संघ आयर्लंडपेक्षा वरचढ असला तरी त्यांना कमी लेखण्याची चूक रोहित शर्मा अॅण्ड कंपनीला महागात पडू शकते. कारण या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आयर्लंडने पाकिस्तानसारख्या तगडय़ा संघाला त्यांच्या देशात हरविलेले आहे. शिवाय जोश लिटिलला आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळण्याचा अनुभव असल्याने तो आपल्या सहकाऱयांच्या साथीने हिंदुस्थानवर पलटवार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
उभय संघ
हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.
आयर्लंड – पॉल स्टार्लिंग (कर्णधार), मार्क एडायर, रॉस अडायर, अॅण्ड्रय़ू बालबर्नी, कर्टिस पॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाइट, व्रेग यंग.
टी-20 वर्ल्ड कप गुणतालिका
अव्वल फलंदाज
फलंदाज धावा स्ट्रा. रेट
जोन्स 94 235
गुरबाज 76 168
झदरान 70 152
गोस 65 141
धालीवाल 61 139
अव्वल गोलंदाज
गोलंदाज वि. सरासरी
फारुकी 5 1.80
नॉकिया 4 1.75
ट्रम्पलमन 4 5.25
वॅन बीक 3 6.00
प्रिंगल 3 6.66
टी-20 वर्ल्ड कप गुणतालिका
संघ सा. वि. प. गुण नेररे
अ गट
अमेरिका 1 1 0 2 1.451
कॅनडा 1 0 1 0 -1.451
हिंदुस्थान 0 0 0 0 0
आयर्लंड 0 0 0 0 0
पाकिस्तान 0 0 0 0 0
ब गट
नामिबिया 1 1 0 2 0
ओमान 1 0 1 0 0
ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0
इंग्लंड 0 0 0 0 0
स्कॉटलंड 0 0 0 0 0
क गट
अफगाण 1 1 0 2 6.250
वेस्ट इंडीज 1 1 0 2 0.411
पीएनजी 1 0 1 0 -0.411
युगांडा 1 0 1 0 -6.250
न्यूझीलंड 0 0 0 0 0
टीप – सा. – सामना, वि. – विजय,
प. – पराभव, नेररे – नेट रनरेट
(ही आकडेवारी अफगाण -युगांडा
सामन्यापर्यंतची आहे.)