
बलूच लिबरेशन आर्मीने (BLS) क्वाटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस या प्रवाशी रेल्वेवर हल्ला चढवत रेल्वे हायजॅक केली होती. रेल्वेच्या नऊ डब्ब्यांमध्ये 500 प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे सध्या बलुचिस्तान चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात पार पडली. त्यानंतर काहीच दिवसांनी रेल्वे हायजॅक करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता, अशी भीती चाहत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच टीम इंडिया बलुचिस्तानात खेळली आहे का? असा सुद्धा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Rohit Sharma Retirement – त्याने का निवृत्ती घ्यावी? रोहित शर्मासाठी मिस्टर 360 ची बॅटिंग
बलुचिस्तानात प्रामुख्याने दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम आहेत. अयुब नॅशनल स्टेडियम आणि बुगती स्टेडियम हे दोन्ही स्टेडियम क्वेटामध्ये आहेत. त्याचबरोबर ग्वादर क्रिकेट स्टेडियम सुद्धा बलुचिस्तानमध्ये आहे, परंतु या स्टेडियममध्ये फक्त देशांतर्गत सामने खेळले गेले आहेत. विशेष म्हणजे 1996 पासून बलुचिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. आतापर्यंत या दोन स्टेडियममध्ये फक्त तीन वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या दोन सामन्यांचा समावेश आहे.
टीम इंडियाने बलुचिस्तानात आपला पहिला सामना 1 ऑक्टोबर 1978 रोजी अयुब स्टेडियमवर पाकिस्ताविरुद्ध खेळला होता. या सामन्यात बिशन सिंग यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 4 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्याच स्टेडियमवर टीम इंडियाने दुसरा सामना 12 ऑक्टोबर 1984 रोजी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात खेळला होता. पाकिस्तानने हा सामना जिंकला होता. बलुचिस्तानात शेवटा आंतरराष्ट्रीय सामना 30 ऑक्टोबर 1996 रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात बुगती स्टेडियमवर खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत बलुचिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही.