6 तासात 3 सामने गमावले, बांगलादेशनेही केला पराभव; Team India साठी रविवार ठरला ‘Black Sunday’

क्रिकेटचा उगम जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटचा सर्वाधिक चाहता वर्ग हिंदुस्थानामध्ये आहे. क्रिकेटची प्रचंड क्रेझ हिंदुस्थानात पहायला मिळते. त्यामुळे टीम इंडियाचा प्रत्येक सामना चाहत्यांकडून मोठ्या उत्सुकतेने पाहिला जातो. मात्र, रविवारचा दिवस याच क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी कधीही न विसरणार ठरला आहे. 6 तासात 3 वेळा टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला.

एडलेड येथे पार पडलेल्या पिंक बॉल कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने जबरदस्त पुनरागम करत टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बराबर झाली आहे. या पराभवाचा टीम इंडियाला मोठा फटका बसला असून WTC गुणतालिकेत टीम इंडियाची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना आता 14 डिसेंबर पासून मेलबर्न येथे सुरू होणार आहे.

दुसरीकडे U-19 Asia Cup च्या अंतिम फेरीत दुबळ्या बांगलादेशने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. यामुळे टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचे आशिय चषक उंचावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. बांगलादेशने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचा संपूर्ण संघ 139 या धावसंख्येवर बाद झाला. बांगलादेशने 59 धावांनी विजय मिळवत आशिया चषकावर आपले नाव कोरले. हे दोन मोठे पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागले.

टीम इंडियाला तिसरा पराभवाचा झटका टीम इंडियाच्या महिला संघाने दिला. टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या सामन्यातील दुसरा वनडे सामना ब्रिस्बेनमध्ये पार पडला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात उतरलेल्या टीम इंडियाचा 122 धावांनी पराभव झाला आहे. ऑस्टेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावत तब्बल 371 धावा केल्या होत्या. तसेच हिंदुस्थाविरुद्धची ही वनडे सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. या पराभवासह टीम इंडियाने ही मालिका सुद्धा गमावली आहे.