
भरधाव वेगात जाणाऱया एका टोयाटो फॉर्च्यूनर कारने जोरदार धडक दिल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री उशिरा विरार येथे घडली. आत्मजा कासाट (46) असे मृत्यू पावलेल्या प्राध्यापिकेचे नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात शिकवायच्या. सदरअपघात प्रकरणी शुभम पाटील या चालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास आत्मजा कासाट या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरून जात असताना पाठीमागून आलेल्या टोयाटो पर्ह्चूनर कारने त्यांना धडक दिली. कार डिव्हायडरवर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कारचालकाने त्यांना नजीकच्या प्रपृती रुग्णालय, आगाशी रोड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी चालक शुभम पाटील याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.