
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट 2025 मध्ये टीडीएस आणि टीसीएस नियमांत बदल केले आहेत. 1 एप्रिल 2025 पासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे एफडी, आरडी आणि अन्य डिपॉझिट स्कीमवर 1 लाख रुपयांपर्यंतच्या कोणत्याही व्याजावर टीडीएस कपात केली जाणार नाही. आधी ही रक्कम कमी होती. ज्यात ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
सामान्य नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा 40 हजारांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. आता 50 हजारांपर्यंतच्या एफडीच्या व्याजावर कोणतेही टीडीएस लागणार नाही. डिव्हिडेंड इन्कमच्या टीडीएस सूटची मर्यादा 5 हजारांवरून 10 हजार करण्यात आली. इन्शुरन्स एजंटसाठी टीडीएस सूटची मर्यादा 15 हजारांवरून 20 हजार करण्यात आली आहे.