ही टॅक्सी आहे, ओयो रुम नाही… टॅक्सी चालकाने प्रेमी युगुलांसाठी लावली मजेशीर पाटी

टॅक्सीच्या मागच्या सीटवर बसून रोमान्स करणारे अनेक प्रेमी युगुल रस्त्यांवर दिसत असतात. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या या प्रेमी युगुलांमुळे अनेकदा टॅक्सी चालकांना मान खाली घालावी लागते. तर आजुबाजुच्यांना देखील नजरा फिरवाव्या लागतात. त्यामुळे एका टॅक्सी चालकाने चक्क त्याच्या टॅक्सीमध्ये नो रोमान्सची पाटीच लावली आहे.

सध्या सोशल मीडियावर एका टॅक्सीमध्ये लावलेली पाटी व्हायरल होत आहे. या टॅक्सी चालकाने त्याच्या गाडीत बसणाऱ्या प्रेमी युगुलांसाठी काही नियम लिहले आहेत. यात त्याने सर्वात आधी त्या पोस्टवर धोक्याची सूचना असे लिहले आहे. त्या खाली गाडीमध्ये नो रोमान्स, ही कॅब आहे. तुमची खासगी जागा किंवा ओयो रुम नाही. त्यामुळे कृपया अंतर ठेवून बसा आणि शांत बसा, असे लिहलेले आहे. त्याच्या या कॅबमधील संदेशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.