…तर जर्मनीही या युद्धात ओढला जाईल; ‘टॉरस क्षेपणास्त्रा’वरून रशियाचा इशारा

रशिया- युक्रेन युद्धात आता आणखी तेल ओतले गेले आहे. जर्मनीने युक्रेनला टॉरस क्षेपणास्त्र पुरवण्यास तयार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता रशियाने थेट जर्मनीलाच इशारा दिला आहे. जर्मनीने युक्रेनला टॉरसचा पुरवठा केला आणि त्या क्षेपणास्त्रांनी रशियाचे नुकसान झाल्यास जर्मनीही या युद्धात ओढला जाईल, असा इशारा रशियाने थेट जर्मनीला दिला आहे.

जर्मनीने युक्रेनला पाठवलेले टॉरस क्षेपणास्त्र जर्मनीला या युद्धात ओढतील, रशियाने असा इशारा थेट जर्मनीचे चान्सलर-इन-वेटिंग फ्रेडरिक मर्झ यांना दिला आहे. जर्मनीने युक्रेनला टॉरस क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे जाहीर केल्यानंतर हा इशारा देण्यात आला. जर्मनीच्या या टॉरस पुरवठ्याच्या घोषणेनंतर युद्धाचा भडका आणखी वाढण्याचा धोका आहे.

जर्मन टॉरस लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून रशियातील वाहतूक पायाभूत सुविधांवर हल्ला झाल्यास या युद्धात जर्मनीचा थेट सहभाग मानला जाईल, असे रशियाने म्हटले आहे. जर्मनीचे चान्सलर-इन-वेटिंग फ्रेडरिक मर्झ यांनी कीवला ते पुरवण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर रशियाकडून हा इशारा देण्यात आला. रशियाच्या कोणत्याही महत्त्वाच्या वाहतूक पायाभूत सुविधांविरुद्ध टॉरसचा हल्ला हे सर्व युद्धात जर्मनीचा थेट सहभाग मानला जाईल, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितले.

ब्रिटनने आधीच सांगितले आहे की जर जर्मनीने क्षेपणास्त्रे पाठविण्याचा निर्णय घेतला तर ते त्यांना पाठिंबा देईल. रशियाने युक्रेनला लांब पल्ल्याच्या शस्त्रे पुरवल्याबद्दल पाश्चात्य देशांवर बराच काळ टीका केली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे.