दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांना उपचाराविना साडेपाच तास बसवून ठेवलं, सीसीटीव्ही आलं समोर

जुळ्या बाळांना जन्म देऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाकारल्याने त्यांचा मृत्यू झाला असा आरोप होत आहे. आता तनिषा यांना रुग्णालय प्रशासनाने साडे पाच तास बसवून ठेवलं होतं याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी केली आहे.

न्युज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. पोलिसांनी मंगेशकर रुग्णालायचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तनिषा यांच्यावर कुठलेही प्राथमिक उपचार न करता तब्बल साडे चार ते पाच तास बसवून ठेवले होते. ही वेळ महत्त्वाची असते. यावेळी रुग्णालयाने काहीच उपचार न केल्याने त्यांची तब्येत बिघडली असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. आता सीसीटीव्ही तपासल्याने ही बाब समोर आली आहे. या प्रकरणी हलगर्जी दाखवल्या प्रकरणी डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी केली आहे.