मिंधेगिरीला भिसे कुटुंबीयांची चपराक, पाच लाखांचा धनादेश केला परत

पैशांअभावी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून रुग्णालयावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. भिसे कुटुंबीयांना मिंध्यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मदत निधीचा धनादेश घेऊन आलेल्या मिंधेंच्या पदाधिकाऱ्यांना भिसे कुटुंबीयांनी धनादेश परत करून हे पैसे आम्हाला नको, तर अशा घटना परत घडू नयेत, यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे; तसेच यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेली एक लाखाची आर्थिक मदतही भिसे कुटुंबीयांनी नाकारली.