भारतीय लोकशाहीवर हल्ला, एक देश एक निवडणुकीला तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांचा विरोध

केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकला मंजूरी दिली आहे. पण तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. हा भारतीय लोकशाहीवर हल्ला आहे असे स्टालिन म्हणाले आहेत.

स्टालिन यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच एक देश एक निवडणूकीचवरचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही व्यवस्था लोकशाहीविरोधातली असून यामुळे प्रादेशिक राज्यांचा आवाज बंद होईल, यामुळे संघराज्य व्यवस्था धोक्यात येईल आणि राज्य चालवण्यात अडचणी येतील, भारताने या विरोधात उभे राहिले पाहिजे. आपली संपूर्ण ताकद लावून हा लोकशाहीवरचा हल्ला परतवून लावू असे आवाहनही स्टालिन यांनी केले आहे.