Crime News – भाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशभरात सध्या महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. त्यामुळे एकीकडे महिलांच्या सुरक्षेची मुक्ताफळे केंद्र सरकारडून उधळली जात आहेत, तर दुसरीकडे भाजप नेत्यानेच 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी एम.एस शहाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एम.एस शहा हा तामिळनाडू राज्यातील भाजप राज्य आर्थिक शाखा मदुराईचा प्रमुख आहे. तसेच त्याचे तिरुमंगलमध्ये खाजगी महाविद्यालय आहे. त्याने अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज सेंड केले होते. वडिलांनी मुलीचा मोबाईल तपासला असता हा सर्व प्रकार उघड झाला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन सविस्तर चौकशी केली. त्यानंतर शहाने घरी नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. तसेच दुचाकी घेऊन देण्याचे आमिष दिल्याचेही मुलीने सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीची आई सुद्दा या कटात सहभागी होती. त्यांनी तक्काळ पोलीस स्थानक घाटत आरोपी शहा आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शहा फरार झाला होता. पोलिसांनी कारवाई करत शहाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.