तामीळनाडूतील मंत्र्याच्या घरी 11 तास ईडीची छापेमारी

तामीळनाडू सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि डीएमके पक्षाचे महासचिव दुराईमुरुगन यांच्या घरी ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी 11 तास छापेमारी केली.

शुक्रवारी दुपारपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत वेल्लोर जिह्यातील दुराईमुरुगन यांच्या घराची ईडीचे अधिकारी झडती घेत होते. ईडीने दुराईमुरुगन, त्यांचा मुलगा खासदार कथिर आनंद आणि इतर आरोपींशी संबंधित वेल्लोर जिह्यातील चार ठिकाणी छापे टाकले. भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आणण्यासाठी ईडीने ही कारवाई केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 200 रुपयांच्या नोटांसोबत बदलून बँक अधिकाऱयांशी फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने हा छापा टाकला.