तमिळनाडूच्या राजकारणात नवे वळन; उदयनिधी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देणार?

udaynidhi

तमिळनाडूच्या अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती होणार अशा चर्चा आहे. यासंदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात येत आहे.

बुधवारी इंडिया टुडे टीव्हीने एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात उपमुख्यमंत्री पदावर उदयनिधी यांच्या नावाची चर्चा आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे सध्या राज्याचे क्रीडा मंत्री आहेत आणि पुढील 24 तासांत त्यांची संभाव्य पदोन्नती अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले.

तत्पूर्वी, अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी एमके स्टॅलिन यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्रीपदावर बढती देण्याचे संकेतही दिले होते.

‘बदल ही एकमेव स्थिर आहे आणि लोक ज्याची अपेक्षा करतात ते लवकरच घडेल’, अशा शब्दात एमके स्टॅलिन यांनी अमेरिकेला अधिकृत भेट देण्यापूर्वी संकेत दिले आहे.