
तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची संपत्ती तामीळनाडू सरकारकडे सोपवण्यात आली. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी बंगळुरू विशेष सीबीआय न्यायालयाने ही संपत्ती जप्त केली होती. कर्नाटक सरकारने शुक्रवारी अधिपृतपणे ही सगळी मालमत्ता तामीळनाडू सरकारला परत केली. यामध्ये सोनं 27 किलो 558 ग्रॅम, तर चांदी 1116 किलो आहे. हस्तांतरित केलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचा मुपुट, हिरेजडीत सोन्याचा मुपुट, जयललितांचं सोन्याचं चित्र, सोन्याची तलवार आहे. काही दिवसांत तामीळनाडू सरकार याचा लिलाव करू शकते. 24 वर्षांपूर्वी जयललितांवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांच्या सहकारी शशिकला, सुधाकरण आणि इलावरासी यांनाही सहआरोपी केले होते. साधारणपणे 27 किलो सोने, 1 हजार 116 किलो चांदी, 7 हजार 40 ग्रॅम इतर दागिने, 1 हजार 526 एकर जमिनीची कागदपत्रे, 2 लाख 20 हजार रुपये रोख, 11 हजार 344 रेशमी साडय़ा, 750 चपलांचे जोड, घडय़ाळांसह इतर महागडय़ा वस्तू अशी त्यांची संपत्ती आहे.