त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी लागणार रीघ; पुण्य कमवण्यासाठी कुंभनगरीत अवतरणार बॉलिवूड

13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू होत आहे. गंगा-जमुनेच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक नट आणि नटय़ा येणार आहेत. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता रणबीर कपूर, विवेक ओबेरॉय, रेणुका शहाणे, राखी सावंत  यांच्यासह बॉलीवूड, टॉलिवूड, भोजपुरी इंडस्ट्री आणि टेलिव्हिजनमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

पौष पौर्णिमेपासून महाकुंभात स्टार्स मंडळी पोहोचण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे सर्वजण आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेणार आहेत. मात्र, आखाडा आणि अध्यात्मिक गुरूंनी अद्याप या स्टार्सच्या आगमनाच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.