
प्रसिद्ध चित्रकार तैयब मेहता यांच्या ट्रस्ड बुल या पेंटिंगची 61.8 कोटी रुपयांना विक्री झाली. 2 एप्रिल रोजी मुंबईत या पेंटिंगला सर्वाधिक बोली लावण्यात आली. तैयब मेहता यांची ही पेंटिंग जागतिक स्तरावर विकली जाणारी हिंदुस्थानची सर्वात महागडी दुसरी पेंटिंग ठरली आहे. सर्वात महागड्या पेंटिंगचा रेकॉर्ड जगप्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसैन यांच्या अनटाइटल्ड (ग्राम यात्रा) च्या नावावर आहे. ही पेंटिंग गेल्या महिन्यात न्यूयॉर्कच्या क्रिस्टी लिलावात तब्बल 118 कोटी रुपयांना विकली गेली आहे. तैयब मेहता यांना 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर 2009 साली त्यांचे निधन झाले.