बार्बाडोस येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा विश्वचषक जिंकत टीम इंडियाने जगभरातील हिंदुस्थानींची मने जिंकली. सध्या देशभरात टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे. इंस्टाग्राम फेसबुक, X वरून टीम इंडियाच्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर टीम इंडिया मालामाल झाली आहे. विजयी संघाला आयसीसीने तब्बल 20.4 कोटी रुपयांच्या रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. तर पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेने 10.67 कोटी रक्कम कमावली. उंपात्य फेरीत पोहचलेल्या अफगाणिस्तान वन इंग्लंड या संघांना 6.5 कोटी देण्यात आले. तर युएस, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश या सुपर8 मधील संघांना 3.17 कोटी रुपये देण्यात आले.
या स्पर्धेतील 9 व्या ते 12 व्या स्थानावर राहिलेल्या संघांना 2.6 कोटी तर 13 व्या ते 20 व्या स्थानावरील संघांना 1.87 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
टी-20 वर्ल्ड कपमधील विजेते अन् उपविजेते
साल विजेते उपविजेते
2007 हिंदुस्थान पाकिस्तान
2009 पाकिस्तान श्रीलंका
2010 इंग्लंड ऑस्ट्रेलिया
2012 विंडीज श्रीलंका
2014 श्रीलंका हिंदुस्थान
2016 विंडीज इंग्लंड
2021 ऑस्ट्रेलिया न्यूझीलड
2022 इंग्लंड पाकिस्तान
2024 हिंदुस्थान द. आफ्रिका