सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा दारुण पराभव करत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. 29 जून रोजी बार्बाडोस येथे हा सामना होईल.
WT20 2024. India Won by 68 Run(s) (Qualified) https://t.co/puDbSN4zv7 #T20WorldCup #INDvENG #SemiFinal2
— BCCI (@BCCI) June 27, 2024
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 172 धावांचे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही. फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ ढेपाळला आणि 16.4 षटकात 103 धावांवर बाद झाला. टीम इंडियाने 68 धावांनी विजय मिळवत फायनलमधील स्थान निश्चित केले. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3, तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल सामनावीर ठरला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्माच्या 57 आणि सूर्यकुमार यादवच्या 47 धावांचा बळावर निर्धारित षटकात 7 बाद 171 धावा केल्या. उपकर्णधार हार्दिक पंड्याने 23 आणि रवींद्र जडेजाने 17 धावांची मोलाची खेळी केली.
विराटचा फ्लॉप शो सुरूच
दरम्यान, विराट कोहली या लढतीतही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 9 धावा केल्या. टोपलीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. या स्पर्धेत आतापर्यंत विराट संघर्ष करताना दिसला आहे. 7 डावात त्याला फक्त 75 धावा करता आल्या आहेत. त्याला एकदाही 50 धावांचा आकडा गाठता आलेला नाही.