आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये रविवारी वेस्ट इंडिज आणि युगांडात सामना खेळला गेला. गुयानाच्या प्रोविडेन्स मैदानात झालेल्या या लढतीत वेस्ट इंडिजने युगांडावर बलाढ्य विजय मिळवला.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 173 धावा केल्या. त्यानंतर युगांडाच्या नवख्या संघाला अवघ्या 39 धावांमध्ये गारद करत 134 धावांनी मोठा विजय मिळवला. टी20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 2014 मध्ये वेस्ट इंडिजने मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत पाकिस्तानचा 84 धावांनी पराभव केला होता.
वेस्ट इंडिजच्या विजयात अकील हुसैन याने मोलाचा वाटा उचलला. त्याने 4 षटकात अवघ्या 11 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. टी20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अकीलआधील मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सॅम्युअल बद्री याने 15 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. हा विक्रम आता अकीलने मोडीत काढला.
Led by Akeal Hosein’s stunning five-for, West Indies produce a brilliant all-round display against Uganda in Guyana 👏#T20WorldCup | #WIvUGA | ➡ https://t.co/pyKWy3HyJV pic.twitter.com/BcZgZNtCVG
— ICC (@ICC) June 9, 2024
दरम्यान, या लढतीत वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॅन पॉवे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर त्याला निकोलस पूरन 22, रोवमॅन पॉवेल 23, आंद्रे रसेल 30 यांनी चांगली साथ दिल्याने वेस्ट इंडिजला 173 धावांपर्यंत पोहोचता आले.
T20 WC 2024 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर मोठा विजय, झंपा ठरला विजयाचा शिल्पकार