Syed Mushtaq Ali Trophy – सूर्याची चौफेर फटकेबाजी, शिवम दुबेनेही घेतला हात धुवून; हैदराबादविरुद्ध मुंबईची सरशी

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये चांगलाच बरसला आहे. शिवम दुबेने सुद्धा हात धुवून घेत तोडफोड फलंदाजी करत मुंबईच्या संघाला बळकटी मिळवून दिली. सेनादलविरुद्ध हैदराबाद येथे पार पडलेल्या सामन्यात मुंबईने 39 धावांनी विजय संपादित केला.

मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा करत 193 धावांचे आव्हान सेनादलाला दिले होते. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि शिवन दुबे यांनी संघाची सुत्र आपल्या हाती घेत सेनादलाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. सूर्यकुमार यादवने फक्त 46 चेडूंमध्ये 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 70 धावा चोपून काढल्या. तसेच शिवम दुबेनेही सूर्यकुमार यादवच्या पाठोपाठ 37 चेंडूंमध्ये 7 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 71 धावांनी वादळी खेळी केली. दोघांनी मिळून 66 चेंडूंमध्ये 130 धावा चोपून काढल्या. यो दोघांव्यतिरिक्त इतर कोणताच फलंदाज जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाने 22 धावांवर, श्रेयस अय्यर 20 धावांवर बाद झाले, तर पृथ्वी शॉ साधा भोपळाही फोडू शकला नाही.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सेनादलाची सुरुवात खराब झाली. कर्णधार मोहित (40 चेंडू 54 धावा) व्यतिरिक्त इतर कोणताच फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर टिकला नाही. मुंबईकडून शार्दूल ठाकुरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच मुलानीने 3 आणि अवस्थी आणि शिवन दुबे यांनी 1-1 विकेट घेतली. त्यामुळे सेनादलाचा संपूर्ण संघ 153 धावांवर बाद झाला आणि मुंबईचा 39 धावांनी विजय झाला.