विधान परिषदेच्या अकरा नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी झाला. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी या वेळी शपथ घेतली.
विधिमंडळाच्या मध्यवर्ती हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात उपसभापती नीलम गोऱहे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. त्यात भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरवे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, शिंदे गटाच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. त्यानंतर नविर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
बाळासाहेबांना नमन करून…
मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेताना ‘मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून शपथ घेतो’ अशी सुरुवात केली, तर शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व परिवाराचे आभार मानले.