ऑस्कर अर्थात अॅपॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने 2025 या वर्षातील पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची यादी आज जाहीर केली. 232 शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांच्या या यादीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘कांगुवा’, ‘ऑल वी इमेजिन एज लाइट’, ‘गर्ल्स विल बी गर्ल’, ‘आदूजीविथम’ या पाच चित्रपटांचा समावेश आहे.
शॉर्टलिस्ट केलेल्या 232 चित्रपटांमध्ये मतदान केले जाईल, त्यानंतर त्यांना ऑस्कर 2025 मध्ये अंतिम नामांकन मिळेल. मतदान 8 ते 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यानंतर, नामांकित चित्रपटांची अंतिम यादी 17 जानेवारी रोजी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चरद्वारे प्रसिद्ध केली जाईल. 97 वा ऑस्कर पुरस्कार 2 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आला आहे.