तो तिसऱ्यांदा करणार होता बलात्कार, पीडितेचे प्रधान सचिवांना पत्र

मध्यवर्ती स्वारगेट बस स्थानकातून गावी जाणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा पीडित तरुणीने केला आहे. आरोपीने तिसऱ्यांदा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेने विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच सरकारी वकील देताना आपल्याला विचारात घेतले नसल्याचा आरोपही तिने केला आहे. पोलिसांच्या कामकाजावरही तिने प्रश्न उपस्थित केला आहे.