कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. एडमॉन्टन येथील हिंदू मंदिर स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या भिंतीवर हिंदू पहबिक चित्रे काढण्यात आली. खलिस्तानी समर्थकांनी हे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॅनडाच्या विश्व हिंदू परिषदेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सरकारने दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.