स्वामी संस्थेने साजरी केली कर्करोगग्रस्तांसोबत दिवाळी, संगीतसंध्या मैफलीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली

स्वामी संस्थेच्या वतीने कर्करोगग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा वाद्यवृंदाने झाली. मराठी, हिंदी गाण्यांच्या या संगीतसंध्या मैफलीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. शनिवारी सायंकाळी 5 वाजता डॉ. शिरोडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी संगीतसंध्या मैफलीला मनापासून दाद दिली.

संगीतसंध्या मैफलीनंतर कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी दिवाळी फराळ आणि एका छानशा बॅगेसह चटई, चादर, टॉवेल, उटण्याचा साबण, तेल, साडी यांचे वाटप करण्यात आले. सुमारे 250 जणांना यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम, अपना बाजारचे अध्यक्ष श्रीपाद फाटक, फेस्कोंचे अध्यक्ष डिचोलकर, समाजसेवक नितीन कदम, स्वामींचे देणगीदार दिलीप बाबू, नाना पालकर, स्मृतीचे खाडिलकर, क्षा.म.सचे विश्वस्त उदय फणसेकर, लायन्स क्लबचे पदाधिकारी भगत, स्वामी पदाधिकारी सल्लागार गजानन माटे, उदय पालकर, किरण करलकर, तृप्ती पवार, उर्मिला जाधव, व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सुरेश लाड, कार्याध्यक्ष मोहन कटारे.

उपाध्यक्षा वैशाली शिंदे, सचिव सुरेंद्र व्हटकर, खजिनदार उल्हास हरमळकर, सहसचिव साध्वी डोके, प्रतिभा सावंत, गोविंद राणे, रचना खुळे आदि उपस्थित होते. दरम्यान, दिवाळी उपक्रम प्रमुख वैशाली ढोलम यांच्यासोबत स्वामी संस्थेच्या समस्त क्रियाशील कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि एकजुटीमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला.