सुझुकी मोटरसायकल इंडियाने ऑटो एक्सपो 2025 मध्ये आपली एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. याची डिझाइन अतिशय स्टायलिश आणि स्मार्ट आहे. सुझुकीने पेट्रोलवर धावणाऱ्या Access 125 पेक्षा यात थोडे बदल केले आहेत. ही स्कूटर थेट TVS iQube, Ather, Bajaj Chetak आणि Ola Electric शी स्पर्धा करेल. यासोबतच कंपनीने सुझुकी ॲक्सेसचे फेसलिफ्ट मॉडेलही बाजारात आणले आहे. यामध्ये काही नवीन पाहायला मिळेल का, याबद्दल माहिती जाणून घेऊ…
सुझुकी तीन ड्युअल-टोन कलर स्कूटरसह ई-ॲक्सेस स्कूटर सादर केली आहे. याची डिझाइन स्मार्ट असून तरुणांना ती आवडू शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्कूटरमध्ये टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, ज्यामध्ये ओडोमीटर, रेंज, बॅटरी, ट्रिपमीटर आणि इतर मूलभूत फीचर्स आहेत.
कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन फीचर आहे. ई-ॲक्सेसला इको, राइड ए आणि राइड बी असे तीन राइड मोड देण्यात आले आहेत. यात एक फॉब देखील आहे, ज्याद्वारे तुम्ही स्कूटरला लांबून लॉक/अनलॉक करू शकता. खराब रस्त्यांसाठी यात टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील आहेत. याच्या सीटची उंची 765 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 165 मिमी आणि कर्ब वजन 122 किलो आहे.
यात 4.1kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 15Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही 3.07kWh बॅटरी पॅकसह येते, जी पूर्ण चार्ज झाल्यावर 95km पर्यंतची रेंज देऊ शकते, असं बोललं जात आहे. याची टॉप स्पीड 71kmph आहे. पोर्टेबल चार्जर वापरून ई-ॲक्सेस 0 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी 6 तास आणि 42 मिनिटे लागतात. फास्ट चार्जरच्या मदतीने ही फक्त 2 तास 12 मिनिटांत चार्ज करता येते.
किंमत
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.20 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.