सुवर्णा घाग यांचे निधन

कांजूर विभागातील सुवर्णा घाग यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या व नेहमी संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घ्यायच्या. 117 शिवसेना शाखेचे उपशाखाप्रमुख सुरेश घाग यांच्या त्या पत्नी होत. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार, 30 डिसेंबरला सकाळी 7.30 वाजता शिवाजी पार्क, दादर येथे होणार आहे तसेच त्यांचे उत्तरकार्य बुधवार, 1 जानेवारी 2025 रोजी अशोकनगर, कांजूर व्हिलेज येथे होणार आहे.