पुरावे द्या किंवा माफी मागा, सुषमा अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंना अब्रुनुकसानीची नोटीस

पदं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मर्सिडीझ गाड्या गिफ्ट कराव्या लागतात असे विधान मिंधे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले होते. गोऱ्हे यांनी पदं मिळवण्यासाठी किती गाड्या दिल्या याची माहिती द्या असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले आहे. तसेच याबाबत पुरावे द्या किंवा माफी मागा असे म्हणत अंधारे यांनी गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

सुषमा अंधारे यांनी वकील असीम सरोदे यांच्या मार्फत मिंधे गटाच्या नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत म्हटले आहे की नीलम गोऱ्हे यांनी पदं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना किती मर्सिसडीझ गिफ्ट केल्या, या गाड्यांची RTO रजिस्ट्रेशन क्रमांक सांगावेत. तुमच्यासोबत आणखी किती जणांनी अशी मर्सिडीझ गिफ्ट केली त्यांचीही नावे सांगावीत किंवा माफी मागावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी या नोटीशीद्वारे केली आहे.