जेव्हा लक्झरी कारचा विषय येतो, तेव्हा रोल्स-रॉइस कार ब्रँडचे नाव सर्वात वर येते. बॉलिवूड कलाकारांची लग्झरी लाईफस्टाईल सर्वांनाच माहित आहे. काहींकडे कोट्यावधींची घरं आहे, तर काहींकडे खूप महागड्या कार्स आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडच्या कोणत्या स्टारकडे देशातील सर्वात महागडी कार आहे, याचबद्दल आपण जाणून घेणार..
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, देशातली सर्वात महाग कार ज्या अभिनेत्याकडे आहे, तो ना सलमान खान आहे, ना शाहरुख खान. मग सर्वात महागडी कार असलेला हा अभिनेता कोण आहे? तर हा अभिनेता आहे इमरान हाश्मी.
इमरान आहे.सर्वात महागड्या लक्झरी कारचा मालक
सर्वात महागड्या लक्झरी कारचा मालक इमरान हाश्मी आहे, ज्याच्या कारची किंमत इतकी आहे की, तुम्ही इतक्या किंमतीत एक महाग बंगला सहज खरेदी करू शकता. बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्याच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉइस घोस्ट ब्लॅक बॅज कारचा समावेश केला होता. इमरान हाश्मीच्या रोल्स रॉयसची किंमत 12 कोटी 25 हजार रुपये आहे.
इमरान हाश्मीची रोल्स रॉयस ही देशातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. इमरान हाश्मीकडे फक्त ही रोल्स रॉयसच नाही तर इतरही अनेक महागड्या आणि आलिशान कार आहेत. या गाड्यांमध्ये मर्सिडीज मेबॅच एस560, लॅम्बोर्गिनी कार आणि लँड रोव्हर रेंज रोव्हर कारही आहे.