दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरूपयोग! सुप्रिया सुळे कडाडल्या

एका लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्या मविआच्या आणि मित्रपक्षाचा आम्ही एकत्र प्रचार करत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी पुण्यात बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलली आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले की यंत्रणेचा गैरवापर करत पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी अदृक्ष शक्ती हे संपूर्ण देशात सुरू आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हा एक गंभीर मुद्दा आहे. यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडणं, घर फोडणं हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी अदृश्य शक्ती करत आहे हे मी वारंवार सांगत आले आहे. ईडी आणि सीबीआयच्या जवळपास 95 टक्के केसेस फक्त विरोधी पक्षांवर आहेत. त्याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे.

Assembly election 2024 – भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस करणार पोलखोल!

विरोधी पक्ष, नेत्यांची घरे फोडाफोडीचे काम तपास यंत्रणांना हाताशी धरुन अदृश्य शक्ती सातत्याने करत आहे. अदृश्य शक्तींनी माझ्या तीन मोठ्या बहिणीं रजनी इंदुलकर, नीता पाटील, विजया पाटील यांच्या घरी पाच दिवस आयटीने छापेमारी करुन त्यांच्यावर कुटुंबासमोर दबाव टाकला. याचप्रकारे संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांचे कुटुंबाना त्रास दिला गेला ते मी पहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या चौकशी लावण्याचे काम षडयंत्रातून केले आहे. आर. आर. पाटील यांच्या संर्दभातील अंतिम चौकशी फाईल देखील फडणवीस यांनीच लावली त्यांचीच मुख्यमंत्री म्हणून त्यावर सही आहे. अजितदादा पवार यांना बोलवून त्यांनी सदर फाईल दाखवली. त्यामुळे फडणवीस यांचेवर खटला भरला पाहिजे त्यांनी राज्याला फसवले आहे. त्यांनी चौकशीच्या फाईल घरी कशा आणल्या व आणल्या तरी ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal – छगन भुजबळ यांच्या दाव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया