सुरेश ढवळे यांचे निधन

सुरेश रघुनाथ ढवळे यांचे 28 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालय येथे उपचार सुरू होते. ते 64 वर्षांचे होते. ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरात राहणारे सुरेश ढवळे नातलगांमध्ये भाऊ म्हणून प्रसिद्ध होते. परिसरात अत्यंत मनमिळाऊ आणि बोलका स्वभाव म्हणून ते परिचित होते. त्यांचा दशक्रिया विधी उद्या 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री कौपिनेश्वर मंदिर, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे. तर दुखवटा कार्यक्रम गणपती मंडळ हॉल, ठामपा शाळा क्रमांक 7, वॉकरवाडी, उथळसर, ठाणे (प.) येथे होणार आहे.