शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्ये खोटे बोलणार नाही, असे म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पैठणच्या मोर्चात ‘डायरीबॉम्ब’ टाकला! वाल्मीक कराडची पुण्यात कोटय़वधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यात एकूण 75 कोटींचे पाच फ्लॅट आणि 40 कोटींची सात दुकाने असून त्यातील एक दुकान संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या नावावर आहे. याशिवाय बार्शी, डिघोळ आणि माजलगावात दीडशे एकर जमीनही असल्याचा गौप्यस्पह्ट धस यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पैठण येथे सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांच्यासह संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, माजी मंत्री अनिल पटेल, संत एकनाथ साखर कारखान्याचे सचिन घायाळ, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, काझी कलिमुल्ला, विकास पाथ्रीकर, दीपक केदार, विजय सुते यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला. परळीतील इराणी टोळी जेरबंद केल्यास बंदूक विक्रीपासून भंगारचोरीपर्यंतचे सगळे गुन्हे उघडकीस येतील, असे धस म्हणाले.
करुणा मुंडे यांच्या गाडीत संजय सानप या पोलीस कर्मचाऱयाने स्त्र्ााrवेषात पिस्तूल ठेवल्याचा गौप्यस्पह्टही आमदार सुरेश धस यांनी केला. पवित्र पैठणमध्ये उभे राहून मी खोटे बोलणार नाही, यातील प्रत्येक शब्द खरा असल्याचे ते म्हणाले.
बुढापा देखकर रोया… अशी गत होईल
‘आका’ने ही संपत्ती काही घाम गाळून कमावलेली नाही. माणसांचे मुडदे पाडून, सर्व नीतिमत्ता पायदळी तुडवून आका आणि त्याच्या आकाने ही हजारो कोटी रुपयांची माया जमवली आहे. ‘पण शेवटी काय? कहां लेकर जाओगे इतना सारा पैसा?’ असा सवाल करत आमदार सुरेश धस यांनी ‘जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहां’ या गीताचे स्मरण करून दिले. तुम्ही हे पचवले तरीही ‘लडकपन खेल मे खोया, जवानी निंदभर सोया, बुढापा देखकर रोया…’ अशीच तुमची गत होणार आहे, असेही ते म्हणाले.
जरीनखान पट्टेवालाचा खून 40 लाखात पचवला!
वाल्मीक कराड याला 2 फेब्रुवारी 2022 रोजी ईडी कार्यालयाने नोटीस बजावली होती. परंतु कराडने त्या नोटिशीचा भिरभिरा केला. ईडीची परळीत येण्याची हिंमतच झाली नाही. त्यामुळे वाल्मीकचे धाडस वाढले. परळीतील इराणी टोळी थर्मलमधील भंगारचोरी, टॅक्टर चोरी तसेच अंमली पदार्थ, पिस्तूल विक्रीत सहभागी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र ‘आका’ आणि त्याच्या ‘आका’कडे दलाली पोहोचत असल्यामुळे इराणी टोळी आजही बिनधास्त आहे. ‘आका’ आणि त्याच्या ‘आका’च्या त्रासाला पंटाळून कोरोमंडल कंपनीने गाशा गुंडाळला. छत्रपती संभाजीनगर येथील जरीनखान पट्टेवाला या माणसाचा खून पचवला. त्याच्या कुटुंबाला 40 लाख रुपये देऊन हे प्रकरण दाबले. काही लाख रुपये खर्च केले तर सहज माणसे मारता येतात, हे चाणाक्ष आकाला चांगलेच उमगले होते, असा टोलाही आमदार धस यांनी लगावला.
आकाची कुंडली निघाली बाहेर, 15 गुन्हे, 8 गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत परळीत दाखल झाले आणि त्यांनी वाल्मीक कराडची पुंडलीच काढली असून कराडवर एकूण 15 गुन्हे दाखल होते. त्यातील 8 गुन्ह्यांमध्ये आकाची निर्दोष मुक्तता झाली तर उर्वरित प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत. यासह आकाच्या गँगमधील सुदर्शन घुलेवर 19, कृष्णा आंधळेवर 6, सुधीर सांगळेवर 2, प्रतीक घुलेवर 5, जयराम चाटेवर 3, महेश केदारवर 6 तर विष्णू चाटेवर 2 गुन्हे दाखल आहेत.
…तर सरकारची गाठ माझ्याशी!
देशमुख व सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरूच राहिला पाहिजे, राज्य सरकारने जर गडबड केली अन् एकही आरोपी सुटला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
हाकेंचा माईक हिसकावला
तुम्ही वाल्मीक कराड, भाजपचे हस्तक आहात. तुम्ही काय आम्हाला न्याय देणार, असे म्हणत भीमसैनिकांनी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचा माईक हिसकावून घेत भाषण करण्यापासून रोखले.
‘आका’ आणि त्याच्या ‘आका’ची संपत्ती
– माजलगाव तालुक्यात शिमरी पारगाव येथे सुदाम बापूराव नरवडेच्या नावाने 50 एकर जमीन
– शिमरी पारगावमध्येच मनिषा सुदाम नरवडेच्या नावाने 10 ते 12 एकर जमीन
– शिमरी पारगावमध्ये वॉचमन योगेश सुदाम नरवडेच्या नावाने 15 ते 20 एकर जमीन
– बार्शी तालुक्यातील मौजे शेंद्रा, शेंद्री येथे ज्योती मंगल जाधवच्या नावावर 50 एकर जमीन
– दिघोळ येथे ज्योती मंगल जाधवच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन
– ज्योती मंगल जाधवच्या नावावर जामखेड येथेही जमीन
– पुण्यात फर्ग्युसन रोडला वैशाली हॉटेलच्या शेजारी सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड यांच्या भागिदारीत सात दुकाने. 601 ते 607 अशी ही दुकाने असून त्याची प्रत्येकी पिंमत पाच कोटी रुपये. एक दुकान विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर असून तीन दुकाने ‘आका’च्या दुसऱया पत्नीच्या नावावर आहेत.
– पुण्यातील मगरपट्टा भागात ऑमिनोरा पार्क, अँड्रोना टॉवर येथे एक अख्खा मजलाच बुक केला आहे. येथे एका फ्लॅटची पिंमत 15 कोटी रुपये आहे. हा मजला वाल्मीक कराडच्या ड्रायव्हरच्या नावाने आहे.
– मावळ प्रांतात गोरख दळवी आणि अनिल बप्पा दळवी हे दोघे बापलेक काम करत असून कुठे काही विकायला निघाले की ते लगेच खरेदी करतात.
परळीत वर्षभरात 109 मृतदेह सापडले, ओळख केवळ चौघांचीच पटली
परळीत वर्षभरात 109 मृतदेह सापडले. मात्र केवळ चौघांचीच ओळख पटली, असा धक्कादायक खुलासा सुरेश धस यांनी केला. यापैकी 105 जणांची प्रेते बेवारस ठरवून दफन केली. अनेकांचे केवळ सापळे अन् हाडेच मिळून आली. याचीही निरपेक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची टोलवाटोलवी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आज पुन्हा टोलवाटोलवी केली. तीन एजन्सी तपास करीत आहेत. जर कोणी दोषी असेल तर पक्ष वैगेरे न बघता दोषी आढळणाऱयावर कडक कारवाई करू, हे पालुपद अजित पवार यांनी जोडले. या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे मुंडे यांचे म्हणणे असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.