Santosh Deshmukh Case – आका सोपा आका नाही, हा आका 17-17 मोबाइल वापरत होता; सुरेश धस यांचा वाल्मीक कराडवर निशाणा

एखादी त्रुटी पोलीस चौकशीत राहिली तर न्यायालायीन चौकशीत कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही. म्हणजे जे कोणी आका, बाका, चाचा, काका, मामा… हे जे सगळे लोक आहेत त्यात.. ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेलं आहे. ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल. न्यायालयाने ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी आमची विनंती असल्याचे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

वाल्मीक कराडकडे अमेरिकेतील नोंदणी असलेले सीमकार्ड आढळले. आणि त्यावरून धमकी देत असल्याचा आरोप आहे. यावर सुरेश धस यांनी उत्तर दिले. आका सोपा आका नाही. हा आका 17-17 मोबाइल वापरत होता. आता तुम्ही नवीन माहिती दिली की, अमेरिकेतून धमकी देत होता. तेही करत असेल. आका काय-काय करू शकत नाही? आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम ठराविक लोकांना पाठवत होता.

खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण एकमेकांशी कनेक्ट आहे. खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुखची हत्या झाली. हे मी नाही तर एसआयटी सांगते. आम्ही राजकीय नेते काहीही बोलू, मात्र एसआयटी खरं सांगतेय. खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवलं, असं एसआयटीने रिमांड मागताना म्हटलं आहे, असे सुरेश धस म्हणाले.