ऊस तोडणी मशीन 141 द्यायचे होते. मात्र, यांनी पाच हजार जणांकडून 8 लाखांप्रमाणे पैसे वसूल केले, असा आरोप करत पहिला गुन्हा पंढरपुरात दाखल झाला आहे, अजून गुन्हे दाखल होणार आहेत. जे पैसे मागायला गेले त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये आका आणि आका हे दोघेही सहभागी आहेत. करोडो रुपयांचा घोटाळा जनतेसमोर आला आहे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
भाजपच्या महामेळाव्यासाठी आल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना साईबाबांना केल्याचे त्यांनी सांगितले.
मला संरक्षणाची गरज नाही
पोलीस संरक्षणबाबत आमदार धस म्हणाले, मला व्यक्तिगत पोलीस संरक्षणाची गरज भासत नाही. जनता हेच माझे सर्वस्व आहे. आमचं बरवाईट करायचं असेल, तर कोणी कुठल्याही पद्धतीने करू शकतो. अंजली दमानिया यांनी कुणाच्याही पह्नला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा पह्न येईल त्यांच्याबाबत तक्रार दाखल करा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, सातही जणांवर मोक्का लागला आहे. मात्र, आकासुद्धाला लागला पाहिजे, असे ते म्हणाले.