surbhi jyoti wedding – निळ्या रंगाच्या लेहेंगा-चोलीमधील ‘या’ खास क्षणांच्या फोटोंनी वेधले लक्ष

टिव्ही अभिनेत्री आणि ‘नागिन’ फेम सुरभी ज्योतीने आपला लाँगटाईम बॉयफ्रेण्ड सुमित सूरीसोबत लग्न केले आहे. तिने नुकतेच आपल्या लग्नातील संगीताच्या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुरभी ज्योती 27 ऑक्टोबर रोजी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या एका रिसॉर्टमध्ये लग्न केले. त्यांनी सांगितले होते की, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सानिध्य़ात विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्न केले.

सुरभी आपल्या संगीताच्या कार्यक्रमात बेधुंद नाचताना दिसत आहे.

संगीत सोहळ्यात सुरभीने निळ्या रंगाच्या लेंहेंगा चोलीमध्ये दिसत आहे.

सुरभी आणि सुमित या फोटोंमध्ये रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहेत.

सुरभीने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने आपल्या हळदी आणि मेहेंदीचे फोटोही शेअर केले आहेत.

या फोटोंमधील एक फोटो लक्षवेधक ठरला आहे आणि सुमितने पत्नी सुरभीला हातात उचलून घेत डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री आरती सिंह, करण ग्रोवर, जेनिफर विंगेट, अंजलि आनंद, अदिति शर्मा, सिंपल कौल यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या लग्नात उपस्थिती लावली होती.