शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा, खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन

खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणात शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने आज हा जामीन मंजूर केला.

कोरोना काळातील खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणात शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून ईडीच्या कारवाईला आव्हान दिले होते. या प्रकरणी मुंबई हाटकोर्टाने आज सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला आहे. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर सूरज चव्हाण यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. जवळपास वर्षभर सूरज चव्हाण हे तुरुंगात होते. आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

ईडीने राजकीय सूडभावनेने केलेल्या अटकेला आव्हान, सूरज चव्हाण यांची हायकोर्टात याचिका

17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली होती. ईडीने ही कारवाई केली होती. राजकीय सूडभावनेतूनच सत्ताधाऱ्यांनी टार्गेट केले आहे. यासाठीच ईडीचा अत्यंत वाईट हेतूने वापर करून मला अटक केली आहे. ईडीने नेमक्या कोणत्या गुह्यासाठी अटक केली आहे हे ठाऊक नाही. असे असताना मागील 8 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले आहे, अशी याचिका सूरज चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केली होती.